Your Voice, Our Headlines

Download Folkspaper App with no Ads!

BULLETIN

A fast-growing newspaper curated by the online community.

रिलायन्स फाउंडेशन व कृषी विज्ञान केद्राच्या वतीने शेतकऱ्यांच्या कंपनी करिता विविध उपक्रम

  • tag_facesReaction
  • Tip Bones

दिनांक १९.१०.२०२० यवतमाळ : आर्णी तालुक्यातील अंबोडा या गावा मध्ये विविध गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पैनगंगा अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीची स्थापन केली, आता या कंपनीच्या शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध उपक्रम राबविण्याचा ध्यास घेतलेला आहे. याची सुरुवात म्हणून आज रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यामतून २० शेतकऱ्यांकरिता ऑडीओ कॉन्फरन्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुरेश नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ तसेच डॉ. प्रमोद नागोराव मगर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी शेतकऱ्यांच्या हरभरा, तुरी, कपाशी, ऊस व हळद या पिकावरील समस्यांवर मार्गदर्शन केले. यामध्ये शेतकऱ्यांद्वारे तूर पिक उधळते, तुरीवरील मर रोगाचे नियंत्रण, कपाशीवरील बुरशीचे नियंत्रण व पातीगळ, हरभरा पेरणीचे नियोजन व व्यवस्थापन, हरभरा पिकावरील मर रोगाचे नियंत्रण, हळद पिकावरील करपा रोगाचे नियंत्रण, उसावरील पिवळेपणा व यावरील नियंत्रण असे विविध प्रश्न विचारण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला लाभलेले मार्गदर्शक डॉ. सुरेश नेमाडे आणि डॉ. प्रमोद नागोराव मगर यांनी सध्याच्या परिस्थिती नुसार मोलाचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या हिताचा असून आता जागेवरच सर्व तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे व यामधून उत्पन्न वाढविण्यास मदत होईल तसेच काही प्रमाणात शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळता येईल अशी प्रतिक्रिया या कार्यक्रमाच्या शेवटी कंपनीचे अध्यक्ष श्री. माधवजी राऊत, अंबोडा यांनी दिली. तसेच कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ दिना निमित्य शिवार फेरी कृषी विज्ञान केद्र यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेली असून शेतकरी बांधवांना उपस्थित राहण्यासाठी डॉ. सुरेश नेमाडे, प्रमुख, कृषी विज्ञान केद्र यवतमाळ यांनी आवाहन केले आहे. आज घेण्यात आलेल्या ऑडीओ कॉन्फरन्स कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रिलायन्स फाउंडेशनचे श्री. प्रफुल बन्सोड, जिल्हा व्यवस्थापक, यवतमाळ व श्री. प्रशांत ढेपे, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Loading...