दिनांक २६.१०.२०२०, यवतमाळ, दारव्हा तालुक्यातील धुळापूर गावामध्ये जनावरांचे रोग निदान शिबीर घेण्यात आले यामध्ये जनावरांमधील रोग निदान लसीकरण व उपचार करण्यात आले. हे शिबीर रिलायंस फाऊंडेशन व तालुका लघु पशुचिकित्सालय पशुसंवर्धन विभाग दारव्हा यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आले, या शिबिरा दरम्यान गोचीड गोमाश्या डासांचा प्रादुर्भाव नियंत्रण करणे, जनावरांना पौष्टिक चारा देणे व टाँनिकचे औषधी पाजणे, जनावरांना प्रतिजैविके इंजेक्शन डाँक्टरांच्या सल्ल्याने देणे, दुधाळ जनावरांची काळजी घेणे इत्यादी बाबत डॉ किशोर बन्सोड, पशुधन विकास अधिकारी यांनी यावेळी उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शन केले. तसेच श्री. प्रफुल्ल बन्सोड, जिल्हा व्यवस्थापक, रिलायंस फाऊंडेशन यांनी शिबिरा मध्ये उपस्थिती पशुपालकांना रिलायन्स फाउंडेशनच्या विविध सेवांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनतर गाय, बैल, म्हशी, बकरी इत्यादी जनावरांना तपासणी करून लसीकरण व उपचार करण्यात आले. यासाठी डाँ. पी. पी. नेमाडे, सहाय्यक आयुक्त व डाँ. किशोर बन्सोड, पशुधन विकास अधिकारी यांनी जनावरांचे योग्य निदान करुन उपचार केलेत. या शिबिरा मध्ये २०० हुन अधिक जनावरांची तपासणी करण्यात आली. गावातील एकही जनावर लसीकरण व उपचारापासून वंचित राहू नये या हेतून डॉक्टर व त्यांच्या चमूने काही पशुपालकांच्या घरी जाऊन सुद्धा तपासणी व उपचार केलेत. या शिबिरातील पशुपालकांनी अशा प्रकारे नियमित शिबिरे गावात व्हावी व आमची जनावरे निरोगी राहावी अशी अशा व्यक्त केली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी, तालुका लघु पशुचिकित्सालय पशुसंवर्धन विभाग दारव्हा याची चमू विशाल सावळे, अश्विन भगत, सुबोध दहीलेकर, विक्की पवार, चेतन इंगळे आणि प्रशांत ढेपे, कार्यक्रम साहाय्यक रिलायंस फाऊंडेशन यांनी अथक परिश्रम घेतले.
रोग निदान शिबीरमध्ये जनावरांवर तज्ञ डॉक्टरांने केले उपचार
- tag_facesReaction
Tip Bones
Comments